@ आमच्या कविता @


आमच्या शाळेतील मुलांनी तयार केलेल्या काही कवितांचा संग्रह .

हत्ती 
एक मोठा मोठा प्राणी 
त्याचे भले  मोठे तोंड, 
लांब लांब नाक त्याचे 
म्हणतात त्याला सोंड. 
          
ससा 
एक छोटा प्राणी 
त्याचे मोठाले कान ,
अंग त्याचे मऊ 
दिसतो किती छान . 

कोंबडा 
एक प्राणी असा 
पहाटेच उठतो , 
छान बांग देतो 
मोठयाने आरवतो . 

No comments:

Post a Comment